प्रतिदिन पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू अधिक तल्लख होतो ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे संशोधन

वॉशिंग्टन – अमेरिकेतल्या रुश विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार प्रतिदिनाच्या भोजनामध्ये एक मोठी वाटी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू ११ वर्षांनी तरुण राहू शकतो. प्रतिदिन हिरव्या भाज्या खाणार्‍या लोकांचा मेंदू अधिक तल्लख असतो आणि त्यांची विचार क्षमताही वेगवान असते. (भारतीय संस्कृतीनुसार भोजनामध्ये पालेभाज्यांचा समावेश करण्यास सांगण्यात आला आहे. त्यातील लाभामुळे असे सांगण्यात आले आहे. आता तेच अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी संशोधनानुसार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून भारतीय संस्कृती किती प्रगत आहे आणि विज्ञान किती मागे आहे, हे पुन्हा एकदा लक्षात येत आहे. – संपादक) या संशोधनामध्ये सुमारे ८१ वर्षांच्या स्मृतीभ्रंशाचा त्रास नसलेल्या ९६० जणांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. वाढत्या वयासमवेत स्मृतीभ्रंश होण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढते आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे रुश विद्यापिठातील शास्त्रज्ञ मोर्था क्लेर मोरिस यांनी सांगितले. प्रत्येक पालेभाजीचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत; मात्र पालक आणि कोबी यांमधील जीनवसत्वे प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF