विकास सचदेवा यांना अयोग्य वर्तन केल्याचे पाहिले नाही !

विमानातील सहप्रवाशाचा खुलासा

मुंबई – अभिनेत्री झायरा वसीम यांचा विनयभंग केल्याचा आरोप असणारे विकास सचदेवा यांनी ‘आर्मरेस्ट’ वर पाय ठेवण्याव्यतिरिक्त कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही, असे सहप्रवाशाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांना त्याने ही माहिती दिली. तो पुढे म्हणाला, ‘‘अभिनेत्री झायरा वसीम आणि विकास सचदेवा यांच्या समवेत मीही विमानात होतो. सचदेवा प्रवासात झोपले होते. त्या वेळी त्यांनी ‘आर्मरेस्ट’ वर पाय ठेवले होते. त्यांना मी अयोग्य वर्तन करतांना पाहिले नाही. त्यांनी झायरा वसीम यांची क्षमाही मागितली होती.’’


Multi Language |Offline reading | PDF