अभिनेत्री झायरा वासिमचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – देहली ते मुंबई ‘विस्तारा एअरलाईन्स’च्या विमानाने प्रवास करत असतांना  स्वत:चा विनयभंग झाल्याचा आरोप चित्रपट अभिनेत्री झायरा वासिमने केला होता. या प्रकरणी कलम ३५४ आणि ‘पॉस्को’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई करत संशयित आरोपी विकास सचदेव या सहप्रवाशाला पोलिसांनी अटक करून

११ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्यांना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पार्श्‍वभूमीवर सचदेव यांची पत्नी दिव्या सचदेव यांनी झायराचे सर्व आरोप फेटाळत, ‘माझे पती निर्दोष असून झायराने ‘लाईमलाईट’साठी हे आरोप केले आहेत’, असे म्हटले आहे. महिला आयोगाने या घटनेची नोंद घेतली आहे.

प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न

श्रीमती सचदेव म्हणाल्या, ‘‘विमानात श्री. सचदेव झोपले होते. एखाद्या झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या आसनापर्यंत गेला, तर तुम्ही त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणाल का ? ‘बिझनेस क्लासमध्ये, जिथे ३०० लोक असतात तेथे असे होऊ शकते का ? लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग झाला होता, तर झायराने तेव्हाच का सांगितले नाही. ती ओरडली किंवा कर्मचार्‍याला का बोलावले नाही. २ घंट्यांनी विमान उतरल्यावर सामाजिक संकेतस्थळांचा वापर करणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा प्रयत्न नव्हे का ?’’


Multi Language |Offline reading | PDF