श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर चीनच्या आस्थापनाला हस्तांतरित

कोलंबो – श्रीलंकेने सैनिकीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे हंबनटोटा बंदर औपचारिकपणे चीनकडे सोपवले. श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी ‘यामुळे आर्थिक उलाढाल वाढेल आणि पर्यटनाला गती येईल’, असा विश्‍वास व्यक्त केला. ९९ वर्षांच्या करारावर हे बंदर चीनला देण्यात आले आहे. सुमारे ७ सहस्र १५० कोटी रुपयांच्या करारांतर्गत हंबनटोटा बंदराचा ७० टक्के भाग चीनच्या आस्थापनाला दिला. श्रीलंकेने हंबनटोटा बंदराच्या विकासासाठी मोठे कर्ज घेतले होते. ते चुकते करण्यासाठी श्रीलंकेने त्याची भागीदारी विकली. विरोधीपक्षाने विक्रमसिंघे सरकारवर देशाची संपत्ती विकल्याचा आरोप केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF