अभिनेत्री झायरा वसीम हिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन

एका अभिनेत्रीशी केवळ असभ्य वर्तन केल्यावर त्याचे मोठे वृत्त प्रसिद्ध केले जाते; मात्र हिंदू तरुणींवर धर्मांधांकडून अत्याचार केले जातात, त्यांना लव्ह जिहादद्वारे फसवले जाते, त्याचे वृत्त नेहमीच दडपले जाते !

मुंबई – काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिच्याशी ९ डिसेंबरच्या रात्री देहली ते मुंबई या विमान प्रवासामध्ये सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन करण्यात आले. सामाजिक माध्यमावरून एका चित्रफितीद्वारे तिनेच ही माहिती दिली. या घटनेला प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर ठळक प्रसिद्धी दिली आहे.

चित्रफितीमध्ये माहिती देतांना झायरा रडत असल्याचे दिसत आहे; मात्र तिने पोलिसांत तक्रार केलेली नाही. विमानात ती झोपलेली असतांना तिच्या मागच्या आसनावर बसलेल्या एका पुरुष प्रवाशाने तिच्या आसनावर मानेजवळ त्याचा पाय टाकून तो झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरून गेली होती.

हा प्रकार घडत असतांना झायराने विमानाच्या कर्मचार्‍यांना याविषयी माहिती दिली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तिच्या साहाय्याला कोणीही धावून आले नाही, असा आरोपही तिने केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now