श्रीलंकेत आता प्रशासकीय अधिकार्‍यांना सूट आणि टाय घालणे अनिवार्य नाही

श्रीलंकेला जमते ते भारताला का जमत नाही ? भारत पाश्‍चात्त्यांचे दास्यत्व कधी झुगारणार ?

राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी २६ वर्षे जुना आदेश पालटला

कोलंबो – श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी २६ वर्षे जुना आदेश पालटत वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी सूट आणि टाय घालण्याऐवजी आरामदायक कपड्यांना प्राधान्य द्यावे, अशी घोषणा केली आहे. वर्ष १९९१ मधील आदेशानुसार श्रीलंका उष्णकटीबंधीय प्रदेश असतांना येथील प्रशासकीय अधिकार्‍यांना सूट आणि टाय घालणे अनिवार्य करण्यात आले होते. राष्ट्रपती सिरीसेना म्हणाले, ‘‘आम्ही आमचा निसर्ग आणि जलवायू यांच्यानुसार कपडे परिधान केले पाहिजे. त्यामुळे अधिक काळासाठी अधिकार्‍यांनी सूट घालण्याची आवश्यकता नाही. आतापासून सूट आणि टाय घालणे अनिवार्य असणार नाही.’’