Mamata Banerjee On CBI : सीबीआयने न्यायालय विकत घेतले आहे ! – ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी

पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !

आतापर्यंत वकिलांना इंग्रजी भाषेमध्ये सनद दिली जात होती; मात्र आता मराठीमध्ये सनद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधी क्षेत्राच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी निर्णय आहे, असे मत बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केले.

उच्चशिक्षित आतंकवाद्याविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निवाडा !

न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, देश टिकला, तरच राज्यघटना राहील. देशाचेच विघटन झाले, तो नष्ट झाला, तर केवळ राज्यघटना असून काय उपयोग ? सर्वप्रथम देशाची सुरक्षितता हवी, अशा प्रकारचे मत देऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित होण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने आवेदन सादर करण्यात आले आहे.

Drunken Judge Suspension : न्यायाधिशांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी ! – मुंबई उच्च न्यायालय

बाजू मांडण्याची संधी न देताच निलंबन झाले असेल किंवा नियमांना डावलून निर्णय देण्यात आला असेल, तर त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकतो; मात्र न्यायाधिशांच्या अशोभनीय वर्तनाला दुर्लक्षित करता येणार नाही, असे या वेळी उच्च न्यायालयाने निर्देशित केले.

आरोपीचे लोकांकडून पुष्पहार घालून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून स्वागत !

समाज असा असेल, तर समाजात नैतिकता कधीतरी शिल्लक असेल का ? समाजाला नैतिकता न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !

वाढते घटस्फोट चिंताजनक !

भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !

राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती तातेड यांच्याकडून पोलिसांना समन्स !

न्यायमूर्ती के.के. तातेड यांनी हा विषय ‘सुओ मोटो’ विचारार्थ प्रविष्ट करून घेत राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्स जारी केले आहे.

WB Violance : जेथे हिंसाचार झाला, तिथे निवडणुका घेऊ नयेत ! – कोलकाता उच्च न्यायालय

हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते.

Rajesh Kotyan Murder:राजेश कोट्यान हत्याप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप !

आरोपींमध्ये महंमद आसिफ (वय ३१ वर्षे), महंमद सुहेल (वय २८ वर्षे), अब्दुल मुतालिप उपाख्य मुत्तू (वय २८ वर्षे) आणि अब्दुल अस्वीर उपाख्य अच्चु (वय २७ वर्षे) यांचा समावेश आहे.