मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

Anti-Conversion Act : बिलिव्हर्सचा पास्टर डॉम्निक याला गोव्यातून तडीपार करा, गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करा !

धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा.

सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांचा ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाकडून सत्कार !

यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत ! – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

इस्रायलच्‍या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !

लव्‍ह जिहादविरोधात कठोर कारवाई करावी !

‘लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून हिंदु युवतींचे शोषण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हावी’, तसेच अशा घटना रोखण्‍यासाठी कठोर असा लव्‍ह जिहादविरोधी कायदा करावा, याविषयी जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले.

‘पतंजली योगपीठ हरिद्वार’कडून अमरावती येथील रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचा सत्कार !

पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले

कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह, अध्‍यक्ष, झटका सर्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘कॅनडाचा हात, खलिस्‍तानी आतंकवाद्यांना साथ !’

गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश

राख्या काढण्यास सांगणार्‍या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई  केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या संकटापासून वाचण्‍यासाठी मुलींना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये धर्माभिमान नाही. त्‍यामुळेच ते जिहाद्यांच्‍या षड्‍यंत्रामध्‍ये फसत आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक पालकाने आपल्‍या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्‍यांच्‍यात धर्माभिमान जागृत करणे आवश्‍यक आहे !