दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी अस्वच्छ हौदाची स्थिती उघड करताच स्वयंसेवकांकडून तात्काळ स्वच्छता !

खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्‍यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

संपादकीय : विठुमाऊलीच्या मंदिराकडे लक्ष द्या हो !

मंदिरांतील पावित्र्यता टिकून रहाण्यासाठी समस्त हिंदूंनी योगदान दिले, तरच मंदिरांतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभारही थांबेल !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातन वैभव परत आणणारा ७३ कोटी ७५ लाख रुपयांचा मंदिर विकास आराखडा !

देवस्थान समितीच्या अखत्यारीतील इतर २८ मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे, तसेच तटबंदी, पडसाळी/ओवर्‍या, मारुति मंदिर आणि इतर छोटी मंदिरे, समाध्या अन् दीपमाळा यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात पूर्वीच्या मंदिर समितीने केलेले बांधकाम प्राचीन बांधकामाशी विसंगत !

व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले. प्रत्यक्षात मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार वाढला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असावे, यासाठी समस्त हिंदू समाजानेच पुढाकार घ्यायला हवा !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दगडी भिंतींना मोठ्या भेगा !

भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.

श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

‘गहाळ’ खतांच्या पूर्व नोंदी !

भ्रष्टाचारी, कलंकित आणि गुन्हेगार यांच्याऐवजी ईश्वराचे भक्त असलेल्या सदस्यांच्या अधीन मंदिरांचे नियंत्रण हवे !

पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना वेग !

विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना प्रारंभ झाला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू असून हे काम पुढील दीड ते दोन वर्र्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामास प्रारंभ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुढील ४५ दिवस दर्शनासाठी बंद रहाणार असून प्रतिदिन ५ घंटे केवळ मुखदर्शन होणार आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात संपूर्ण दिवस मुखदर्शन चालू ठेवण्याची हिंदु महासभेची मागणी !

१५ मार्चपासून श्री विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाच्या सुशोभिकरणासाठी मंदिरातील पदस्पर्श दर्शन बंद होणार असल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. स्थानिक व्यापारी, दुकानदार यांची उपासमार होणार आहे.