सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे रामराज्य संकल्प यज्ञ !

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

हिवरे गावामध्ये (पुणे) या वर्षी झेंड्याच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाचा हा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे, अशी नम्र विनंती आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.

सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र ठाऊक नसल्याने बहुतेकांना त्यांचा लाभ पूर्णपणे घेता येत नाही, तसेच ते साजरे करतांना काही विकृत प्रथा वाढत चालल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात गुढीपाडवा नववर्षानिमित्त सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले !

गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय कला अकादमी, पुणे यांच्या वतीने गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त शोभायात्रा पार पडली !

राष्ट्रीय कला अकादमी, पुणे यांच्या वतीने ९ एप्रिलला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले.