कृतघ्न भारतीय तरुण !

‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !

‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात…

‘सगळे ईश्वरेच्छेने होते’, हे लक्षात घेतल्यावर नेहमी आनंदी रहाता येते !

काळानुसार काय होणार आणि नाही होणार, ते आपण शिकत जायचे. पुढे आपल्याला कोणतीच इच्छा रहात नाही आणि ‘देवा, तू करशील, ते करशील’, अशी आपली विचारप्रक्रिया होते, मग आपण नेहमी आनंदी असतो.

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी आणि साम्यवादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याविषयी जाणवलेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक स्थिर आणि आनंदी दिसतो’, असे म्हणणे आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनीही ‘त्यांच्या देहत्यागानंतर स्थिर होशील’, असे सांगणे

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे लक्षात ठेवावे !

‘काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खासगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेने आमूलाग्र पालट झालेले पनवेल येथील कै. लक्ष्मण बाजीराव जोशी (वय ७४ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

ते म्हणाले, ‘‘मी आज औषध घेणार नाही; कारण मी आज जाणार आहे. मग मी औषध कशाला घेऊ ?’’ ‘‘मी उद्या नसेन.’’ दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे नेहमीच्या तुलनेत अधिक उंच आणि विराट रूपात दर्शन होणे

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जात असतांना मला परात्पर गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) त्यांच्या खोलीच्या बाहेर दर्शन झाले. मला त्यांच्याकडे पहाता क्षणी ते नेहमीच्या तुलनेत ‘अधिक उंच आणि विराट’ असे दिसले.

विविध प्रकारच्या सेवा भावपूर्ण आणि कौशल्याने करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख ! (वय : ३६ वर्षे) !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची आई आणि बहीण यांना श्री. निषाद यांच्यात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आद्य शंकराचार्य यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले