Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: August 5, 2017

राष्ट्रध्वजाचा मान राखा ! या चळवळीअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सरकारी कार्यालयांत तसेच अनेक महाविद्यालयांत देण्यात आली निवेदने !

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात. या वेळी कागदी किंवा प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्र्र्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचर्‍यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात.

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. राधा गडोया, तसेच उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अन् ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. समृद्ध चेऊलकर हे दोघे या पिढीतील आहेत !

धर्म विसरल्याने भारतातील विविध भागांतील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म !

केरळमधील स्वयंसेवकांच्या हत्यांच्या प्रकरणांत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा ! – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

केरळमध्ये गेल्या १३ मासांत रा.स्व. संघाच्या १४ कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे; मात्र राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

पाककडून ७ मासांत २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन ! – संरक्षणमंत्री अरुण जेटली

पाकने या वर्षी १ ऑगस्टपर्यंत २८५ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत हेच प्रमाण २२८ एवढे होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कपात सूचनांवर उत्तरे देण्यास विधीमंडळ प्रशासनाची उदासीनता !

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या वर्षभरात अधिवेशनासाठी एकूण ३४३ कपात सूचना दिल्या होत्या.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २ कोटी रुपये संमत

गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

पोटनिवडणुकीचा दिनांक पुढे ढकलावा अन्यथा मतदानावर बहिष्कार !

गणेशोत्सव हा गोव्यातील हिंदूंचा सर्वांत मोठा सण आहे. या सणाच्या तोंडावरच निवडणूक घेऊन सरकारने हिंदूंच्या उत्साहावर विरजण घालून हिंदूंना अपमानित केले आहे.

तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या २ नौसैनिकांना कारावास

नौदल कर्मचार्‍यांच्या ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या दोन नौसैनिकांवर नौदलाने कोर्टमार्शल करून त्यातील एकाला १५ वर्षे, तर दुसर्‍याला १२ वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक नवीन गवते याला वाशी दिवाणी न्यायालयाने ३ ऑगस्ट या दिवशी १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.