Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Monthly Archives: July 2017

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास चीनला नक्षलवादी आणि साम्यवादी साहाय्य करतील. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास पाकला जिहादी साहाय्य करतील; पण हिंदूंच्या साहाय्याला देव सोडून कोण आहे ? देवाचे साहाय्य मिळवण्यासाठी हिंदूंनो, साधना करा !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्याची हत्या

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश एडावाकोडे यांची २९ जुलैच्या रात्री एका टोळीकडून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर १५ हून अधिक वार करण्यात आले, तसेच त्यांचे हात कापण्यात आले.

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ न गायल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही !’ – केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

‘वन्दे मातरम्’ म्हणणे किंवा न म्हणणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवड आणि विचार यांवर अवलंबून आहे. ‘वन्दे मातरम्’ न म्हणण्याचा संबंध देशभक्तीशी जोडता येणार नाही.

युद्धासाठी सिद्ध रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेवरील डोकलाम तिठ्यावरून भारत अन् चीन यांच्यामध्ये चालू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने डोकलामच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव चालू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युद्धासाठी सिद्ध रहा’, असा आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्याला दिला आहे.

(म्हणे) ‘पाकिस्तानने काश्मीरची समस्या निर्माण केली नाही !’ – ओमर अब्दुल्ला यांचे देशद्रोही विधान

काश्मीरच्या किंवा प्रत्येक समस्येसाठी पाकला उत्तरदायी ठरवले जाते; मात्र आम्हाला माहिती आहे काश्मीरमधील हिंसा आणि अस्थिरता पाकने निर्माण केलेली नाही. येथे वर्ष २००८, २०१० आणि २०१६ मध्ये झालेल्या हिंसेच्या मागे पाक नव्हता, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या बिहारच्या मुसलमान मंत्र्याच्या विरोधात फतवा

बिहार विधानसभेच्या आवारात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे नेते खुर्शीद उपाख्य फिरोज अहमद यांच्या विरोधात इमारत-ए-शरीया यांनी फतवा काढला आहे.

मुंबई प्राप्तीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांवर बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट

बेहिशोबी मालमत्ता असणारे प्राप्तीकर विभागातील अतिरिक्त आयुक्त विवेक बत्रा यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंदवला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९ वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या दाखवल्या

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९ वीच्या भूगोलाच्या पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या दर्शवल्या आहेत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा वापर करण्याचा अघोरी निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची पुणे महापालिकेला चेतावणी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा वापर करण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या धर्मविरोधी निर्णयाचा मागील वर्षी फज्जा उडाला.