‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मायेतील शिक्षण आणि साधना यांतील भेद !

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

ʻईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले