डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित होण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने आवेदन सादर करण्यात आले आहे.

शिखर बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी बंद करण्याची मुंबई पोलिसांची मागणी !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत कोणत्याही प्रकारे अनियमितता नाही. त्यामुळे बँकेतील कथित घोटाळ्याचे अन्वेषण बंद करावे, अशी विनंती राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे.

पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनाही मिळणार गणवेश !

खाद्यपदार्थ आणि औषधे यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेले अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही पोलिसांप्रमाणे गणवेश दिला जाणार आहे.

आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !

जगद‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळा २८ जून २०२४ या दिवशी आणि प्रस्थान दुपारी २ वाजता पार पडणार आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !

श्री संकटमोचन हनुमान मंदिर, कण्णीनगर, दहिटणे येथे सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या शुभहस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. प्रशांत वालीकर हेही उपस्थित होते.

सैन्य अधिकार्‍याचा गणवेश घालून अवैध मद्यविक्री करणारा धर्मांध अटकेत !

सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक ! सैन्यअधिकारी असल्याचे भासवून गुन्हे करण्याचे धैर्य करणारे धर्मांध देशासाठी घातकच होत !

राज्याच्या शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी !

मागील महिन्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरीही मंत्रालयातील अधिकोषातून झाली होती. हे चोर अद्याप सापडले नाहीत.

कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !

२१ ऑक्टोबर २००८ या दिवशी धाराशिव जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी. बसगाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला होता.

बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !

सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह आहे, तर अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह दिले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या.

माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप

सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काही नाही. माझ्या मालमत्ता, तसेच अधिकोषातील खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे कसे परत करू ? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.