Close
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११९

अांतरराष्ट्रीय बातम्या

सर्जिकल स्ट्राईकमधून जगाला भारताच्या सैनिकी सामर्थ्याचे दर्शन झाले ! – पंतप्रधान मोदी

भारतीय सैन्याने सीमारेषा ओलांडून आतंकवाद्यांना नष्ट केले. भारतीय सैन्याच्या कारवाईवर कोणीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही.

काश्मिरी हिंदूंना ‘विस्थापित नागरिक’ घोषित करा !

भारतातील काश्मिरी हिंदूंना आंतरिक स्वरूपातील विस्थापित नागरिक घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथील काश्मिरी हिंदू फाऊंडेेशन या संस्थेने दिले आहे.

अफगाणिस्तानमध्ये १० पोलीस ठार

हेरातमधील ‘सलमा’ धरणावर तालिबान्यांनी केलेल्या आक्रमणात १० पोलीस ठार झाले, तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ आतंकवादी ठार झाले. हे धरण भारताने बांधून दिले आहे.

पाकच्या सिंध उच्च न्यायालयाने बळजोरीने धर्मांतरित हिंदु युवतीला तिच्या धर्मांध पतीसोबत रहाण्यास बाध्य केले !

येथे रविता मेघवार या १६ वर्षांच्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिला बळजोरीने मुसलमान करण्यात आले आणि नंतर तिचे एका ३५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावण्यात आल्याची घटना घडली होती.

मानसरोवर यात्रेच्या प्रकरणी भारतासमवेत चर्चा चालू आहे ! – चीन

दोन दिवसांपूर्वी चीनने सिक्कीमच्या नाथूला-पास येथे मानसरोवर यात्रेसाठी जात असलेल्या भारताच्या दोन गटांना रोखले होते.

मलेशियामध्ये भारतीय तरुणाच्या मृत्यूनंतर वाढत्या गुंडगिरीविरोधात रोष

मलेशियामध्ये काही दिवसांपूर्वी १८ वर्षाच्या भारतीय वंशाच्या टी. नवीन या तरुणावर काही जणांनी लैंगिक अत्याचार करून त्याला अमानुष मारहाण केली होती. रुग्णालयातच उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हाईट हाऊसमधील इफ्तारची मेजवानी रहित

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिवर्षीप्रमाणे व्हाईट हाऊसमध्ये देण्यात येणारी इफ्तारची मेजवानी रहित केली आहे. गेल्या २० वर्षांपासून ही मेजवानी देण्यात येत होती. मात्र त्यांनी मुसलमानांना रमझानसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चीनने नाथूला-पास येथे कैलास मानसरोवर यात्रा रोखली !

चीनने कैलास मानसरोवर यात्रा नाथूला पास येथे रोखली आहे. येथील यात्रेकरूंच्या दोन पथकांना पुढे जाऊ देण्यात आलेले नाही. सध्या हे यात्रेकरू येथेच थांबले आहेत.

चीनमधील १०० हून अधिक उघूर मुसलमानांना सरकारी आदेशाचे उल्लंघन करून रोजा ठेवल्यामुळे शिक्षा

चीनच्या शिनजियांग प्रांतातील १०० हून अधिक उघूर मुसलमानांना सरकारी नियमांचे उल्लंघन करत रोजा ठेवल्याने दंड आणि शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये केवळ ३३ डिग्री तापमानामुळे नागरिक त्रस्त !

इंग्लंडमध्ये तापमान ३३ डिग्रीच्या वर पोहोचले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच इतके तापमान वाढले आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.