Close
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११९

नोंद

मराठीची सक्तीच आवश्यक !

नुकतेच राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ’ स्थापन करणे राज्य शासनाने सक्तीचे केले आहे. त्याविषयीच्या कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनाला कळवण्यास बंधनकारक करण्यात आले असून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने तशा सूचना राज्यातील सर्व विद्यापिठांना दिल्या आहेत.

आनंदमय पालखी सोहळा ! 

विठ्ठलभेटीच्या ओढीने भगवी पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत जाणारा लक्षावधी वैष्णवजनांचा मेळा म्हणजे पालखीसोहळा ! संतांचे चैतन्य अन् विठ्ठलभक्तांचा भोळा भाव यांमुळे शेकडो वर्षांची वारीची परंपरा आजही टिकून आहे. वर्षागणिक तरुणांचा सहभागही वाढत आहे.

संजय दत्त, पॅरोल आणि शिक्षा 

वर्ष १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी देशद्रोही संजय दत्त याला शिक्षा झाली; मात्र ही शिक्षा कायमच चर्चेत राहिली, ती संजय दत्त याला मिळालेल्या वारेमाप सुट्ट्यांमुळे ! शिक्षेच्या कालावधीत संजय दत्त याने वैयक्तिक कारणे सांगून पॅरोल मिळवला आणि तो प्रत्येक वेळी वाढवूनही घेतला. याशिवाय कारागृहातील वर्तन चांगले असल्याच्या प्रशस्तीपत्रकावरून (?) शिक्षा पूर्ण होण्याच्या आठ महिने त्याची मुक्तताही झाली.

भारत-पाक क्रिकेट सामन्याचे उदात्तीकरण थांबवा !

वाहिन्या, आकाशवाणी आणि अन्य प्रसारमाध्यमांतून ४ जून या दिवशी लंडन येथे झालेल्या भारत-पाक क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी सामन्याविषयीची बरीच चर्चा झाली.

सीमा सुरक्षा दलाच्या भरतीला अवकळा !

सीमा सुरक्षा दलामध्ये या वर्षी रिक्त जागांसाठी निवड झालेल्यांपैकी ६० टक्के उमेदवारांनी कामावर रुजू होण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. वर्ष २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत निवड करण्यात आलेल्यांना वर्ष २०१७ मध्ये कामावर रूजू व्हायचे होते.

शत्रूराष्ट्राचा खेळ करा !

‘शत्रूराष्ट्रा‘शी’ खेळ नको, तर शत्रूराष्ट्रा‘चा’ खेळ करा’, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची भावना असतांना भारत मात्र पाकड्यांसमवेत आज चेंडूफळी खेळण्यासाठी उभा ठाकला आहे.

संपाचे राजकारण !

स्वत:च्या मागण्या पूर्ण न होण्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी दूध, फळे आणि भाजीपाला यांची नासाडी करण्यात येत आहे. यातून एकप्रकारे अन्नपूर्णा देवतेचा अवमान होऊन संबंधितांनी स्वत:वर तिची अवकृपाच ओढवून घेतली आहे.

नीतीमान अधिकारी हवेत !

केंद्रीय दक्षता आयोगाच्या वार्षिक अहवालानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने केंद्र सरकारकडे भ्रष्टाचार आणि अन्य प्रकरणांमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांवर निलंबनाची, तसेच अन्य स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस केली होती; मात्र या शिफारशींवर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हवे !

तहान लागल्यावर विहीर खोदण्यास प्रारंभ केल्याप्रमाणे आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची तर्‍हा आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कागदोपत्री पूर्णकालीन व्यवस्था असली, तरी प्रत्यक्षात मात्र ही संकल्पना आपत्ती आल्यावरच कार्यान्वित होतांना दिसून येते.