Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

सण-उत्सव

साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.

अक्षय्य तृतीयेला करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तीलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे.

अक्षय्य तृतीया साजरी करण्याची पद्धत

कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा – हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील श्री हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील मारुति नवसाला पावणारा असल्याने सहस्रो भाविक दर्शन घेण्यासाठी आज निमणी येथे येत असतात.

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमीनिमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्प करून तो प्रत्यक्षात यावा; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्तस्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करा !

२८.३.२०१७ या दिवशी गुढीपाडवा आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे हेमलम्बीनाम संवत्सर, शालिवाहन शके १९३९ चा हा पहिला दिवस आहे.

गुढीची झुकलेली स्थिती

ही जिवाच्या ईश्‍वराप्रती असलेल्या शरणागत भावामुळे कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. शरणागत स्थितीत कार्यरत झालेली सुषुम्ना नाडी ही जिवाच्या जीवात्मा-शिव दशेचे द्योतक आहे.

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.