Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

संपादकीय

सार्वत्रिक आरोग्याचे कुपोषण

आपल्या देशात मोठा गाजावाजा करून विकासप्रकल्प राबवले जात आहेत. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, ‘स्मार्ट सिटी’चा चकचकाट अशा एक ना अनेक योजना राबवून देशाला अत्याधुनिक चकचकीत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन भारताला ऊर्जितावस्था आणणे चालू आहे.

हसन रुहानी यांचा विजय !

इराणमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी दुसर्‍यांदा विजयी झाले. या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. इराणचे कट्टरवादी धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी या निवडणुकीत विशेष रस दाखवला.

हिंदूंनो, आता स्वस्थ बसणे नाही !

कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाला ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचा हेर असल्याच्या समजुतीखाली पाकने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली.

कुलभूषण जाधव जिवंत आहेत का ?

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर ज्या अपेक्षेने स्थगिती केली त्याच अपेक्षेने पाकने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही, हेही घोषित केले. पाक असेच वागणार हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही.

हिंदु शक्ती !

उत्तरप्रदेशमध्ये सध्या योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. या सरकारने नुकतेच त्याच्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले. या सरकारच्या पूर्वी तेथे सत्तेत असलेल्या समाजवादी पार्टीच्या काळात जे अराजक माजले होते, त्याला आळा बसला आहे, असे आपण म्हणू शकतो.

जय गुरुदेव ! कृतज्ञ गुरुदेव !

आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ही उक्ती आज आम्ही अगदी तंतोतंत अनुभवत आहोत. राष्ट्रगुरु, ज्ञानगुरु, मोक्षगुरु, विश्‍वगुरु, जगद्गुरु अशा कितीही पदव्या थिट्याच वाटणारे आमचे परमपूज्य हे खरेतर कल्पतरुच आहेत.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आणि सनातन प्रभात समूह !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी २९ मे २०१६ पासून १८ मे २०१७ पर्यंतचा कालावधी सनातन परिवारात अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आनंदाने साजरा होत आहे

नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक !

‘नमामि देवी नर्मदे सेवा यात्रे’च्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात असलेल्या अनेक नद्या सुकत चालल्याविषयी चिंता व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले, ‘‘सध्या देशात अनेक नद्या आहेत; मात्र त्या केवळ नकाशावरच आहेत. याविषयी अनेक नद्या पुढे लुप्त होतील कि काय, अशा स्थितीत आहेत.’’

आपवर ‘मिश्रा’वार !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यावर राजकीय वातावरण बरेच तापलेे. सध्या कुठलाही नेता अथवा एखाद्या राजकीय पक्षाचा मंत्री यांच्यावर असे आरोप होतच असतात; मात्र आपचे तसे नाही.

आजपासून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव सप्ताह’

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, १८ मे २०१७ या दिवशी सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आहे. त्यानिमित्ताने आम्ही दैनिकातून १५ मे ते २१ मे या कालावधीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव सप्ताह’ साजरा करत आहोत.