Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

उत्तर अमेरिका

अमेरिकेतील वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या २३ वर्षांच्या युवकाला १०० वर्षांची शिक्षा

अमेरिकेतील इलिनॉइ येथे ८८ वर्षांच्या विधवा वृद्धेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी २३ वर्षांच्या टेविन राइनी नावाच्या युवकाला १०० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रे योगासनांवर १० टपाल तिकिटे काढणार

२१ जून या दिवशी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांचे टपाल प्रशासन न्यूयॉर्कमध्ये योगासनांवर आधारित १० तिकिटे प्रसिद्ध करणार आहेत.

साबण, अत्तर, शाम्पू आदींच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका !

सुगंधी साबण, अत्तर, डिओ आणि शाम्पू आदींची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कर्करोगाला सर्वाधिक बळी पडत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेत कर्करोगावर संशोधन करणार्‍या एका संस्थेने काढला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या गोळीबारात ३ जण ठार

येथे कोरी अली महंमद नावाच्या ३९ वर्षीय व्यक्तीने येथे ककेलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले.

शिकागो (अमेरिका) येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता

अमेरिकेच्या शिकागो येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता मिळाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालू असलेल्या या शाळेला आता फॉरेन लँग्वेज स्कूलचा दर्जा मिळाला आहे.

चिली देशात बलात्कारपीडित ननकडून चर्चवर खटला प्रविष्ट

येथील एका कॅथॉलिक चर्चशी संबंधित ननवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गर्भवती राहिलेल्या ननने या चर्चच्या विरोधात खटला प्रविष्ट केला आहे.

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

येथील सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.

आता इसिस आणि अल्-कायदा यांच्याकडून ‘लॅपटॉप बॉम्ब’ची निर्मिती !

इसिस आणि अल्-कायदा ह्या जिहादी आतंकवादी संघटनांनी ‘लॅपटॉप’मध्ये सामावतील एवढ्या लहान प्रकारचे बॉम्ब बनवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. हे बॉम्ब विमानतळावर स्कॅनिंग केल्यानंतरही ‘डिटेक्ट’ होणार नाहीत, अशा पद्धतीने निर्माण करण्यात येत आहेत.

अमेरिकेत मुसलमान कुटुंबाच्या घरावर अज्ञातांकडून आक्रमण

येथील फॅयरफेक्स काउंटी भागात पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान परिवाराच्या घरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केली. यानंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू पळवल्या, तसेच कुराणाचा अवमान केला.

अमेरिकेत श्‍वेतवर्णीय विद्यार्थ्यांकडून कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना हीन वागणूक

मॅपलवूड येथील एका शाळेतील ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णवर्णीय मुलांना गुलाम संबोधून त्यांचा लिलाव करण्याचा खेळ आयोजित केला होता.