(म्हणे) ‘भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवणे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात !’ – जनरल मुनीर, पाकचे सैन्यदलप्रमुख

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा अत्यंत सहजपणे पुरवठा !’ – महंमद उस्मान इकबाल जादून, पाकिस्तान

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्‍चर्य !

Pakistan Chinese Officers : पाकमध्ये चिनी अधिकार्‍यांच्या फिरण्यावर चीनकडून बंदी !

युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे.

(म्हणे) ‘कलम ३७० विषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकीय !’ – अन्वर काकर, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !

पाकच्या जिल्हा पोलीस मुख्यालयावरील आतंकवादी आक्रमणात ३ पोलीस ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती आक्रमणात ३ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले.

Pakistan On Article 370 : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवर भारतीय राज्यघटनेचे वर्चस्व मान्य करणार नाही !’ – पाकिस्तान

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानचे आकांडतांडव !

Pakistan Relations : भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी संबंध सुधारायचे आहेत, तर चीनशी अधिक दृढ करायचे आहेत ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्‍न आहेत !

पुलवामा येथील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आलमगीर याचे पाकिस्तानमध्ये अपहरण

आतंकवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे हाफिजाबाद येथून अज्ञातांनी अपहरण केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स अल्जेब्रा’ने प्रसारित केले.

आतंकवादी साजिद मीर याच्यावर विषप्रयोग !

पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहात अटकेत असलेला मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या कटातील आतंकवादी साजिद मीर याला विष देण्यात आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पाकमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

पाकमध्ये भारतात कारवाया करणार्‍या आणखी एका जिहादी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अदनान अहमद उपाख्य हंजला अदनान याची कराचीत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.