Shah Mahmood Qureshi : पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कुरैशी यांची सुटका झाल्यानंतर पाकने त्यांना पुन्हा टाकले कारागृहात !

भारताच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात पाकमधील सत्तेत असणार्‍या राजकारण्यांनी किती गोष्टी केल्या, तरी सत्ता जाताच त्यांना राजकीय छळाला सामोरे जावे लागते, हेच कुरैशी यांच्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले !

हुती बंडखोरांनी लाल समुद्रात पाकिस्तानला जाणार्‍या नौकेवर केले आक्रमण !

लाल समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर झालेल्या आक्रमणानंतर आता येमेनमधील हुती बंडखोरांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाणार्‍या एका नौकेवर आक्रमण केले.

Taliban Pakistan Relation : अफगाणिस्तान कुणाच्याही धमक्यांपुढे झुकत नाही ! – तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे पाकिस्तानला प्रत्युत्तर

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये बर्‍याच दिवसांपासून तणाव आहे.

Hindu Woman Pakistan Election : पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच हिंदु महिला निवडणूक लढणार !

त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला !’

तालिबान भारताच्या साहाय्याने बांधणार कुनार नदीवर धरण : पाकला संताप !

तालिबानी राजवटीला अफगाणिस्तानातून वहाणार्‍या कुनार नदीवर धरण बांधायचे आहे. त्यासाठी भारतीय आस्थापनाचे साहाय्य घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. यामुळे ४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

नरसंहाराच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर !

‘भारताला हिंस्र ठरवणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !

Nawaz Sharif : आपला शेजारी देश चंद्रावर पोचला, तर आपण अजून भूमीवरून उठूही शकलेलो नाही ! – नवाझ शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून भारताचे कौतुक करणारे विधान !

पाकिस्तानच्या दुरवस्थेला भारत उत्तरदायी नाही : पाकने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

पाकच्या दु:स्थितीला भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका कारणीभूत नसून त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. पाक सैन्याने वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले आणि देशावर एक सरकार थोपवले.

(म्हणे) ‘भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवणे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात !’ – जनरल मुनीर, पाकचे सैन्यदलप्रमुख

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा अत्यंत सहजपणे पुरवठा !’ – महंमद उस्मान इकबाल जादून, पाकिस्तान

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्‍चर्य !