Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

बंगाल

बंगालमधील महापालिकांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार

१४ मे या दिवशी बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उघडपणे शस्त्रास्त्रे घेऊन फिरत होते

इमाम बरकती यांना पदावरून हटवण्यात येणार !

सैयद नूरूर रहमान बरकती यांना टीपू सुलतान मशिदीच्या इमामाच्या पदावरून हटवण्यात येणार आहे. याची प्रक्रिया चालू आहे

कोलकात्यामध्ये एका मंदिरात अमिताभ बच्चन यांची त्यांच्या उंचीहून मोठ्या मूर्तीची स्थापना !

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेला ‘सरकार ३’ हा चित्रपट १२ मे या दिवशी प्रकाशित झाला. त्या पार्श्‍वभूमीवर येथील एका मंदिरात अमिताभ यांच्या उंचीपेक्षा उंच अशी त्यांची मूर्ती स्थापन करण्यात आली

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सैनिकाला अमानुष मारहाण

बंगालच्या हुगली जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सैन्यदलातील सैनिक प्रवीणकुमार रजक यांना बेदम मारहाण केली. जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीत सेवा बजावणारे श्री. प्रवीणकुमार सुट्टीनिमित्त घरी आले होते.

(म्हणे) ‘नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढू शकत नाहीत !’

आम्हाला ब्रिटीश सरकारच्या काळात गाडीवर लाल दिवा लावण्याची अनुमती मिळाली होती. त्यामुळे आता नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरील लाल दिवा काढू शकत नाही, असे आव्हान बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी दिले आहे.

बर्दवान (बंगाल) येथील बॉम्बस्फोटात तृणमूल काँग्रेसचे कार्यालय उद्ध्वस्त

बर्दवान जिल्ह्यातील पिचकुडी धाल येथील एका इमारतीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तेेथे असलेलेे तृणमूल काँग्रेसचे कार्यालय उद्ध्वस्त झाले.

भाजपने बंगालमध्ये आम्हाला लक्ष्य केल्यास आम्ही देहली जिंकू ! – ममता बॅनर्जी

भाजपवाले तृणमूल काँग्रेसला घाबरले आहेत. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या माध्यमातून ते आम्हाला धमकी देत आहे; पण तृणमूल काँग्रेस या धमक्यांना घाबरत नाही.

भारत-नेपाळ सीमेवरून ४५ कोटी रुपयांची अष्टधातूची मूर्ती जप्त

प्रतिबंधात्मक आणि गुप्तचर विभागासह सशस्त्र सेना दलाने केलेल्या कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून ४५ कोटी रुपयांची अष्टधातूची मूर्ती जप्त करण्यात आली.

बांगलादेशच्या सीमेवर गोतस्करीसाठी ८० मीटर लांब भुयार खणल्याचे उघड

सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशच्या सीमेवर गोतस्करीसाठी ८० मीटर लांब भुयार खणण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बंगालमधील आयआयटी खरगपूरच्या निपिन एन्. नावाच्या एका विद्यार्थ्याने वसतीगृहामधील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मूळचा केरळचा आहे.