Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

उत्तर प्रदेश

उत्तरप्रदेशमध्ये कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकल्याने ४० प्रवासी घायाळ

उत्तरप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच खतौली येथे उत्कल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातानंतर २३ ऑगस्टला पहाटे आणखी एक दुर्घटना घडली. औरेया येथे कैफियत एक्सप्रेस रूळांवरून घसरली. यामध्ये ४० प्रवासी घायाळ झाले आहेत.

आग्रा येथे गायी आणि बैल यांच्यावर आम्ल फेकले !

आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात २४ हून अधिक गायी आणि बैल यांच्यावर आम्ल (अ‍ॅसिड) फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राममंदिर उभारणीचा प्रस्ताव मांडावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर होते, असे पुरातत्व खात्याने सर्वेक्षणात म्हटले आहे. याच अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर उभारणीच्या संदर्भात संसदेत प्रस्ताव आणावा, अशी मागणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केली.

अयोध्येत राममंदिरच उभारायला हवे ! – वसीम रिझवी, शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

रामजन्मभूमीवर राममंदिरच उभारायला हवे, तर मशीद अन्यत्र बनवली पाहिजे आणि तिचे नाव ‘मस्जिद-ए-अमन’ ठेवायला हवे, असे प्रतिपादन शिया सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि गोळीबार

बेहटा गुसाई येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला.

रस्त्यावरचा नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी कशी घालू ? – योगी आदित्यनाथ

जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना रोखू शकत नसेन, तर ‘राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका’, असे सांगण्याचा कोणताही अधिकार मला नाही

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणार्‍या मदरशांच्या संबंधितांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाई होणार !

उत्तरप्रदेश शासनाने आदेश देऊनही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत न गाण्याच्या प्रकरणी सरकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे.

फैजाबाद येथे सनातन संस्थेचा राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या कार्यासाठी सन्मान

या वेळी ‘सेवा सहयोगी संगम’च्या वतीने सनातन संस्थेला ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण’ या कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी लक्ष्मणपुरी मधील एका भाजी मंडईत संस्कृत भाषेचा वापर !

‘संस्कृतच आमची प्रमुख भाषा आहे. सरकार संस्कृतसंदर्भात पक्षपात करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे तेथील एका भाजी विक्रत्याने सांगितले.