सामूहिक बलात्काराच्या आरोपामध्ये खटल्याच्या विलंबामुळे जामीन देता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

१५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना गंभीर असून खटल्याचा विलंब हे जामीनाचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पुणे येथील एका शाळेत शिपायाचा १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !

पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचाराविषयी कुणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘खटला मागे घे’ असे म्हणत अधिवक्त्याकडून महिलेचा विनयभंग !

असे अधिवक्ते लोकांना काय न्याय मिळवून देणार ? अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

हिंदूंमध्ये शौर्यवृद्धी व्हावी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात १२ ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुणे येथे एका व्यक्तीकडून ३ लाखांहून अधिक रुपये जप्त !; पनवेल येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणारे तिघे जण कह्यात !…

अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्‍यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण अन् गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यांत हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी यासाठी आयोजित ‘गदापूजन’ उत्साहात पार पडले !

हिंदूंनी शस्त्रपूजन करणे, हे त्यांच्यातील क्षात्रवृत्तीच्या वाढीसाठी पोषक आहे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश  जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !

शासनाच्या अधिकतम विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारच्याच या अहवालातून दिसून येत आहे. यांमधील अनेक प्रकरणांत लेखापरीक्षण अहवालाद्वारे अपहार उघड झाल्यावर पैशांची वसुली करण्यात आली आहे; मात्र दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही.

देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी आदींना स्व-घोषणापत्राने मतदार होता येणार !

यात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे !

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

‘जी २०’साठी केलेल्या झाडांवरील रोषणाई ७ दिवसांत हटवा !

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे विभागांना आदेश !