Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

महाराष्ट्र

राहुरी खुर्द (जिल्हा नगर) येथील गणपति मंदिरात चोरी

येथील राहुरी खुर्द गावातील गणपति मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आणि त्यातील १५ सहस्र रुपये चोरले. ही घटना २१ जूनला घडली.

(म्हणे) ‘कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना अतिरेकी घोषित करा !’

पुरोगामी चळवळीतील नेते कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना ‘अतिरेकी’ घोषित करा, अशी मागणी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पुरोगामी पक्ष

श्रीपूजकांचे हक्क ठरवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची समिती नियुक्त !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक यांचे हक्क आणि अधिकार ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

सरकारकडून आठवडाभरात समीर गायकवाड यांच्या विरोधात आव्हान याचिका प्रविष्ट होणार !

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन दिला होता.

एअर इंडियाच्या संग्रहालयात म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार !

मरीन ड्राईव्ह येथील एअर इंडियाच्या इमारतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी एअर इंडिया ९ सहस्र चौरस फुटाच्या संग्रहालयात जगभरातील ३०० कलाकारांची चित्रे प्रदर्शित करणार आहे.

ध्वनीप्रदूषणावरील आदेशावर कार्यवाही करण्यास सर्वच यंत्रणा अनुत्सुक ! – उच्च न्यायालयाचे ताशेरे

उत्सवात होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वारंवार आदेश देऊनही त्यांची कार्यवाही करण्यास सगळ्याच संबंधित यंत्रणा फारशा उत्सुक नाहीत. एवढेच नव्हे, तर त्याद्वारे त्यांनी न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचेच दाखवून दिले आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्शाचालकांवर कारवाई

कल्याण आणि डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्शाचालकांवरील कारवाईची आर्टीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम चालू केली आहे.

पहाटे येऊन खिडक्या आणि गाड्या यांच्या काचा फोडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप पोलिसांनी फेटाळला

हाटे ३ वाजता गस्तीसाठी गावात आलेल्या पोलिसांनी दरवाजे, खिडक्या आणि गाड्या यांच्या काचा फोडल्या, असा नेवाळी येथील गावकऱ्यांनी केलेला आरोप पोलिसांनी फेटाळला आहे.

१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील सनातन संस्थेच्या साधकांचे सुयश !

जिल्ह्यातील सनातन संस्थेच्या साधकांनी १० वीच्या परीक्षेत सुयश मिळवले आहे. सांगली येथील कु. प्रणिता प्रशांत जोशी हिला ९० टक्के (५०० पैकी ४४९ गुण) मिळाले असून ती ग.रा. पुरोहित कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे.

निवृत्त प्रभारी आरोग्यप्रमुखाच्या स्वाक्षरीचे जन्म-मृत्यूचे दाखले करण्यात आले वितरित 

महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासनाने पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस्.टी. परदेशी ३१ मे या दिवशीच सेवेतून निवृत्त झालेले असतांना त्यांची स्वाक्षरी असलेले शेकडो जन्म आणि मृत्यू यांचे दाखले वितरित केले आहेत.