Close
ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया, कलियुग वर्ष ५११९

जम्मू कश्मीर

भारतीय सैन्याकडून पाकचे २ कमांडो ठार

उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असणार्‍या भारतीय सैनिकांवर घात लावून आक्रमण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅटने) केला; मात्र भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न उधळून लावत बॅटच्या २ कमांडोंना ठार केले.

अमरनाथ यात्रेवर आतंकवादी आक्रमणांसह दगडफेक होण्याचाही धोका !

काश्मीरमध्ये २९ जूनपासून आरंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेवर आतंकवादी आक्रमणासह दगडफेक होण्याचीही शक्यता आहे, यासाठी सरकारने अमरनाथ यात्रेच्या मार्गावर २७ सहस्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

२० काश्मिरी हिंदूंची हत्या करणार्‍या बिट्टा कराटे याच्या विरोधात नव्याने आरोपपत्र प्रविष्ट करण्याची माजी केंद्रीय गृहसचिवाची मागणी

जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता असणारा आतंकवादी फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे याने १९८० च्या दशकात २० काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची स्वीकृती कॅमेर्‍यासमोर दिली होती. त्याच्या ध्वनीचित्रफितीचे प्रक्षेपण सध्या वृत्तवाहिन्यांकडून केले जात आहे.

भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना करणारा आतंकवादी ठार

भारतीय सैनिकाच्या मृतदेहाचे शिर कापून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या आतंकवाद्याला भारतीय सैनिकांनी ठार केल्याचे वृत्त आहे.

पुलवामामध्ये देशद्रोही विद्यार्थ्यांकडून पोलिसांना मारहाण

पुलवामा येथे देशद्रोही विद्यार्थी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच येथे पोलिसाची गाडी जाळण्यात आली. ७ एप्रिल या दिवशी येथील विधी महाविद्यालयातील देशद्रोही विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात वाद झाला होता.

भारतीय सैन्याने नौशेरा भागातील पाकच्या सैनिकी चौक्या उद्ध्वस्त केल्या !

भारतीय सैन्याने पाकच्या नौशेरा भागातील सैनिकी चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी बंकर उडवल्याची चित्रफीत सैन्याने प्रसारित केली आहे. भारतीय सैन्याचे मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.

४ रायफल घेऊन पळालेला पोलीस आतंकवादी संघटनेत सहभागी झाल्याची शक्यता

बडगाम जिल्ह्यात २० मेच्या दिवशी सैय्यद नाविक (मुश्ताक) हा पोलीस ४ रायफल्स घेऊन फरार झाला होता. तो हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे

काश्मीरमध्ये शाळकरी मुलांना वाटण्यात येत आहेत बंदुका घेऊन असणार्या मुलांची छायाचित्रे !

काश्मीरमधील फुटीरतावादी त्यांच्या मुलांना देशात आणि विदेशात चांगले शिक्षण देत आहेत; मात्र काश्मिरी शाळकरी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ते प्रत्येक प्रकारे षड्यंत्र रचत आहेत.

नौगाममध्ये ३ सैनिक हुतात्मा, तर ४ आतंकवादी ठार

नौगाम येथे घुसखोरीचा प्रयत्न करतांना झालेल्या चकमकीच्या वेळी सैनिकांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले; मात्र याच वेळी ३ सैनिक हुतात्मा झाले.

पाकच्या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील १ सहस्र नागरिकांचे स्थलांतर

पाककडून सातत्याने होणार्‍या गोळीबारामुळे काश्मीरमधील सीमेजवळ रहाणार्‍या लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जीवितहानी रोखण्यासाठी हे स्थलांतर करण्यात येत आहे.