Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

गोवा

गोव्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना साधा भागाकारही येत नसल्याचा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतला अनुभव !

राज्यातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देणार आहे.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज या विघातक खेळासंदर्भात गोवा पोलिसांकडून पालकांना सतकर्तेची सूचना

जगभरात, तसेच भारतातही अनेक लहान मुलांचे, तसेच युवकांचे प्राण घेणार्‍या ब्ल्यू व्हेल चॅलेंज या विघातक ऑनलाईन खेळाच्या संदर्भात गोवा पोलिसांकडून पालकांना सतकर्तेची सूचना देण्यात आली आहे.

अमली पदार्थ प्रकरणी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प : पोलिसांवर खापर

अमली पदार्थ प्रकरणी मागील चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प आहे आणि याला पोलीसच उत्तरदायी आहेत, असा आरोप होत आहे.

सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

समाजात अनेक आश्रम आहेत; पण सनातनच्या आश्रमासारखा आश्रम कुठेही नाही. सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल आहे, असे गौरवोद्गार ओणी-कोंडिवळे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाविषयी काढले.

अमली पदार्थ प्रकरणी मडगाव आणि मोरजी (गोवा) येथे दोघांना अटक

अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मडगाव आणि मोरजी येथे २ जणांना अटक केली. मडगाव येथे चिडायू ओराझल्मे या नायजेरियातील नागरिकाला २९ ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली.

अमली पदार्थाची विक्री होत असल्यास संबंधित आस्थापनांच्या मालकांवर कारवाई करणार ! – पोलीस

समुद्र किनारपट्टीलगतचे क्लब, उपाहारगृहे, गेस्ट हाऊस, पब आणि हॉटेल यांठिकाणी अमली पदार्थाची विक्री होत असल्यास किंवा ग्राहकांकडे अमली पदार्थ सापडल्यास संबंधित आस्थापनांच्या मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार

पोलिसांचा मंदिरे आणि चर्च यांना सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखण्याचा सल्ला

दक्षिण गोव्यात विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तोडफोडीच्या आणि चोरीच्या घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व मंदिर आणि चर्च यांच्या व्यवस्थापनाला धार्मिक स्थळाच्या दृष्टीने ……

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींप्रमाणेच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींवरही गोवा शासनाने बंदी घालावी !

वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा निर्णय घेतला. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal) याचिका दाखल केली.

हणजूण येथे रेव्ह पार्टीमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

हणजूण येथे रेव्ह पार्टीमध्ये दोन पर्यटकांचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांच्या विशेषत: उत्तर गोव्यातील किनारपट्टीत अमली पदार्थांच्या विरोधातील मोहिमेला वेग आला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हातकातरो स्तंभाचे जतन करण्याविषयीच्या जागृती मोहिमेला प्रारंभ

पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर धर्मसमीक्षणसभेच्या (इन्क्विझीशनच्या) माध्यमातून केलेल्या अत्याचारांची साक्ष देणारा एकमेव जुने गोवे येथील हातकातरो स्तंभ नष्ट करण्याचे कारस्थान गोमंतकात चालू आहे.