Close
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११९

देहली

६७ सहस्रांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सेवेचा आढावा घेतला जाणार

केंद्र सरकार त्याच्या ४९ लाख कर्मचार्‍यांमधील ६७ सहस्रांपेक्षा अधिक कर्मचार्‍यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा आढावा घेणार आहे.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग विसर्जित करावे अथवा बहुसंख्यांक आयोगाचीही स्थापना करावी ! – विहिंप

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची मानसिकता फुटीरतावादी आहे. देशातील सर्व लोकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी मानवाधिकार पुरेसे नाही का ?

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत भारताने केलेली प्रगती ! 

भारताने लोकसंख्या वाढीवर प्रतिबंध घातला नाही, तर वर्ष २०२४ मध्ये ती चीनच्या पुढे जाऊन भारत जगातील पहिल्या क्रमाकांचा लोकसंख्या असणारा देश होणार आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७६० कोटी असून ती वर्ष २०५० मध्ये ९८० कोटी होणार आहे.

मानसरोवर यात्रेच्या प्रकरणी भारतासमवेत चर्चा चालू आहे ! – चीन

दोन दिवसांपूर्वी चीनने सिक्कीमच्या नाथूला-पास येथे मानसरोवर यात्रेसाठी जात असलेल्या भारताच्या दोन गटांना रोखले होते.

देहली येथे चोरांनी पोलिसांनाच लोकांकडून चोप दिला !

भ्रमणभाष संच चोरी करणार्‍या चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या २ पोलिसांनाच या चोरट्यांनी लोकांकडून चोप दिल्याची घटना येथे नुकतीच घडली.

लॉकरमधील मौल्यवान वस्तू हरवल्यास बँक उत्तरदायी नाही ! – रिझर्व्ह बँक

बँकेतील लॉकरमधून मौल्यवान वस्तू हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्यासाठी बँकेला उत्तरदायी धरता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवाना रहित

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना देण्यात आलेला पेट्रोलपंपचा परवाना भारत पेट्रोलियमने (बीपीसीएल्ने) रहित केला आहे.

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍यांनी पाकमध्ये चालते व्हावे ! – राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष सैय्यद गयारूल हसन रिझवी

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद येथे साजरा करणार्‍यांनी पाकमध्ये चालते व्हावे किंवा त्यापेक्षा सरकारनेच त्यांना पाकमध्ये पाठवून दिले पाहिजे.

कुलभूषण जाधव प्रकरणात पुनर्विचार होऊ शकतो ! – पाक

कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्याच्या प्रकरणात पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे विधान पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे.

भारत संचार निगम लिमिटेडसहित अन्य भ्रमणभाष आस्थापनांकडून रमझान ईदनिमित्त मुसलमानांसाठी विशेष योजना

भारत संचार निगम लिमिटेडकडून रमझान ईदनिमित्त मुसलमानांसाठी विशेष योजना घोषित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अन्य भ्रमणभाष आस्थापनांनीही विशेष योजना काढल्या आहेत.