Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

बांग्लादेश

बांगलादेशातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्माचरण करून सर्व हिंदूंपुढे धर्मासाठी कसे जगावे याचा आदर्श ठेवणार्‍या अधिवक्ता रविंद्र घोष यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णा रविंद्र घोष !

बांगलादेश येथील बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णा रविंद्र घोष या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित होत्या. बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांचे समितीचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण, त्यांंच्या भूमींवर अतिक्रमण आणि भारतात हाकलून लावण्याची धमकी

बांगलादेशच्या मगुरा जिल्ह्यातील शालिखा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु कुटुंबियांची भूमी गिळंकृत करण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केले.

बांगलादेशने चीनकडून २ पाणबुड्या विकत घेतल्या !

भारताने युद्ध करून पाकपासून वेगळा करून स्वतंत्र देश बनवलेल्या बांगलादेशने चीनकडून २० कोटी ३० लाख अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या २ पाणबुडया विकत घेतल्या आहेत.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा उत्सवासाठी या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या.

बांगलादेशातील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध विहिंप कोलकात्यातील दूतावासासमोर निदर्शने करणार

विश्‍व हिंदू परिषदेने बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी १ जुलै या दिवशी कोलकाता येथे बांगलादेशाच्या दूतावाससमोर निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेश येथे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण !

६ मार्च २०१७ या दिवशी बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांचे भाऊ ज्योतिंद्र घोष यांचे देहावसान झाले. त्यामुळे भावाच्या अंत्यसंस्कारांसाठी अधिवक्ता घोष हे ढाका येथून चितगांव येथे आले होते.

बांगलादेशच्या सैन्याकडून म्यानमारच्या सीमेवर रोहिंग्या मुसलमानांना दिले जाते सैनिकी प्रशिक्षण !

म्यानमारच्या सीमेवर रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशच्या सैनिकांकडून सैनिकी प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी सौदी अरेबिया आणि कुवेत या देशांमधून आर्थिक साहाय्य पुरवले जाते आहे.

बांगलादेशात धर्मांधांकडून चकमा जनजातींच्या ३०० घरांची जाळपोळ

बांगलादेशात रंगामतीच्या लोंगाडू उपजिल्ह्यात पोलीस आणि सैन्य यांच्या पाठिंब्याने धर्मांधांनी चकमा जनजातींच्या सुमारे ३०० घरांना आगी लावल्याची घटना घडली आहे.

बांगलादेशात सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवीची मूर्ती कट्टरवादी धर्मांधांमुळे हटवण्यात आली !

येथील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात असलेली न्यायदेवीची मूर्ती अखेर हटवण्यात आली. ही मूर्ती काढण्यासाठी कट्टरवादी धर्मांध अनेक मासांपासून मागणी करत होते.

बांगलादेशात धर्मांधांकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेची मूर्ती हटवून कुराण ठेवण्यासाठी आंदोलन !

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात असलेली न्यायदेवतेची मूर्ती हटवून तेथे कुराण ठेवण्याच्या मागणीसाठी धर्मांधांकडून आंदोलन करण्यात येत आहे.