Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

आशिया

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे देणार ! – चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त

६८ कोटी रुपयांचा पहिला श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात येणार आहे.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे वितरण !

येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुप्रिया घाटगे यांचे वडील श्री. बंडोपंत गणेश पुजारी यांचा अमृत महोत्सव सोहळा १४ मे या दिवशी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला.

थेट जलवाहिनी योजनेतील ५० कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून सत्ताधारी आणि विरोधक यांचा गोंधळ !

आयआर्बी आस्थापनाचे पैसे माजी मंत्र्यांनी खाल्ले आणि कारभार्‍यांनाही वाटले, हे जगजाहीर आहे. जलवाहिनी योजना संमत करून आणणार्‍यांनीच यामध्ये भ्रष्टाचार केला

काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी सैन्याने अरुंधती रॉय यांनाच जीपला बांधायला हवे होते ! – खासदार परेश रावल

काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांवर दगडफेक करणार्‍यांना रोखण्यासाठी सैनिकांनी स्थानिक तरुणाऐवजी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनाच त्या जीपला बांधायला हवे होते

४ रायफल घेऊन पळालेला पोलीस आतंकवादी संघटनेत सहभागी झाल्याची शक्यता

बडगाम जिल्ह्यात २० मेच्या दिवशी सैय्यद नाविक (मुश्ताक) हा पोलीस ४ रायफल्स घेऊन फरार झाला होता. तो हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे

पुणे शहर आणि परिसरात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण अधिक

वाहनचोरी, भ्रमणभाषचोरी अथवा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय होत आहेत, तसेच हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतही अल्पवयीन आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे.

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

गोवंडी, देवनार बसआगाराजवळील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर ८ मे या दिवशी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भुईसपाट करण्यात आले.

संगमनेर येथे गोवंशांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून आक्रमण

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे गोवंशाची अवैधरित्या हत्या करण्यात येत असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाल्यानंतर तो गोवंश सोडवण्यासाठी पोलिसांचे पथक १९ मे या दिवशी एका डाळिंबाच्या मळ्यात कारवाईसाठी गेले होते.

शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करणारे खाजगी विधेयक संसदेच्या पुढच्या अधिवेशनात येणार !

भाजपचे खासदार रमेश बिधुडी संसदेच्या पुढील अधिवेशनात शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करण्यासाठीचे खाजगी विधेयक मांडणार आहेत.

कोळसा घोटाळाप्रकरणी माजी सचिव गुप्ता यांंन २ वर्षांचा कारावास

कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणी कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच्.सी. गुप्ता यांच्यासह आणखी एका अधिकार्‍याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.