Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

अाफ्रीका

ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांना भ्रष्टाचारप्रकरणी साडेनऊ वर्षांची शिक्षा

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांना भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने साडेनऊ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवली आहे.

ट्यूनिशिया येथे रोजा न ठेवणार्‍यांवर कारवाई केल्याने नागरिकांकडून विरोध 

मुसलमानांना रोजा ठेवण्यासाठी बळजोरी करण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडून रस्त्यावर उतरून विरोध करण्यात येत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रोजा ठेवणे ऐच्छिक असले पाहिजे. नुकतेच येथे रोजा न ठेवणार्‍यांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली.

कांगोमध्ये जिहाद्यांनी कारागृहावर केलेल्या आक्रमणात ९३० कैदी फरार

आफ्रिकेतील कांगो देशातील बेनी शहरातील एका कारागृहावर जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले, तर ९३० कैदी पळून गेले.

दक्षिण आफ्रिकेत तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर ३ महिलांकडून ३ दिवस सामूहिक लैंगिक अत्याचार

येथे एका २३ वर्षीय तरुणाला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याचे अपहरण करून त्याच्यावर ३ दिवस सामूहिक लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ तरुणींचा पोलीस शोध घेत आहेत.

इजिप्तमध्ये आतंकवाद्यांकडून २४ ख्रिस्त्यांची हत्या

इस्लामी राष्ट्र असणार्‍या इजिप्तची राजधानी कैरो येथे सैनिकी वेशातील ८ ते १० जिहादी आतंकवाद्यांनी एका बसला थांबवून त्यावर केलेल्या गोळीबारात २४ ख्रिस्ती ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे.

आफ्रिकी शरणार्थींची लिबियातील गुलामांच्या बाजारात विक्री

युरोपमध्ये स्थलांतरित होणार्‍या आफ्रिकेतील शरणार्थींना लिबियातील गुलामांच्या बाजारात विकले जात आहे, अशी माहिती ‘इन्टरनॅशनल ऑर्गनाईझेशन फॉर मायग्रेशन’ चे लिबियातील प्रमुख ऑथमन बेलबेसी यांनी दिली.

इजिप्तच्या चर्चमधील बॉम्बस्फोटात २१ लोकांचा मृत्यू

इजिप्तच्या नाईल डेल्टा या शहरातील एका चर्चमध्ये ९ एप्रिलला झालेल्या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण घायाळ झाले आहेत.

संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या फलकावरील भारताच्या नकाशातून काश्मीरचा भाग गायब !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या येथील मुख्यालयामध्ये लावण्यात आलेल्या फलकावर भारताच्या नकाशामध्ये काश्मीरचा वरचा भाग नसल्याचे निदर्शनास आले आहे.