Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

August 13, 2017

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून लेगिंग्जवर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून विडंबन

हे चित्र छापण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून त्यांना विडंबन कळण्यासाठी चित्र छापण्यात आले आहे.

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील रेड बबल या आस्थापनाने त्याच्या लेगिंग्ज या उत्पादनावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून त्याचा अवमान केला आहे. या लेगिंग्जची या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. आस्थापनाच्या या अयोग्य कृतीचा राष्ट्रप्रेमी भारतीय पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत. या पूर्वी या आस्थापाने हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या लेगिंग्जची विक्री केली होती.

इमेल : [email protected]

ट्विटर: twitter.com/redbubblehelp

फेसबूक : facebook.com/Redbubble/timeline

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !